Pages

Monday, September 09, 2019

नव्हतेच कधी ते तुझे...

नाही दिलेस तू जे नव्हतेच कधी ते तुझे
विरलेले वारे देती ओल्या घनांचे दिलासे

मिणमिणती कातरवेळ संथ सुरावटीची
तम दाटता गहिरासा दूरस्थ त्या ताऱ्याची

जाणिवांचा स्पर्श असा अवचित अवघडलेला
पाऊस पांघरून मी आहे माझ्याच सोबतीला

देणे होते त्या मोत्यासाठी एक डाव मांडिला
अश्रू साठवून उराशी तो शिंपला गहिवरलेला
© दिनेश गिरप

No comments: