Pages

Friday, July 26, 2019

पहाट

तुझ्या स्पर्शातलं मर्म
मन चिंब ओलावलं
तुझ्या डोळ्यात आकाश
 वर चांदणं पीठूर

बंध किती जन्माचे हे
झाली स्वप्नांची पहाट
शून्य तिमिर जाहला
पूर्व दिशा उजळेल

बघ दिस उजाडला 
रान जागे जाहलेलं
एका छोट्या घरट्यात
सारं जग सामावलं

No comments: