Pages

Sunday, February 28, 2016

प्रोफेसर अय्यर

गावी दहावी झाल्यावर पुढील शिक्षणासाठी मुंबईला आलो. त्यावेळी मुंबईमध्ये प्रतिशयत समजली जाणारी जी काही मोजकी कॉलेजीस होती त्यापैकी एक एसआईइएस कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला. गावाच्या मराठभोळ्या आणि शिस्तबद्ध शाळांमध्ये शिकलेल्या मला मुंबई चे कॉलेज कल्चर नवीन आणि अचंबित करणारे होते! विद्यार्थांच्या  कान, हात ,गाल यांचा वापर करूनच शिकविता येते अशी ठाम समजूत असणारे शिक्षक मी बघितलेले. इथे मुंबईत आल्यावर लेक्चर बंक करणे, अटेंडन्स घेत असताना मित्राची "प्रॉक्सी" मारणे, बेंच खाली बसून कादंबरी वाचणे, प्रोफेसर ची नजर वळली की वर्गातून बाहेर जाणे किंवा आत येणे आणि इतर बऱ्याच गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या !! 

एसआईइएस मध्ये आम्हाला फिजिक्स शिकवायला अय्यर नावाचे प्रोफेसर होते. पन्नाशीचे अत्यंत संयमी आणि मृदू व्यक्तिमत्व. त्यांच्या लेक्चर ला वर्गात जो काही गोंधळ चालायचा तो पंचवीस वर्षापूर्वी कवितेत उतरवला होता ! 


       प्रोफेसर अय्यर
नाव त्याचे अय्यर असते
खरं सांगा, तुम्हाला का ते पटते ?
नाव पाहिजे होते भोला शंकर 
कारण आहेच मुळी तसा आमचा अय्यर 

लेक्चर सुरु होते त्याचे  
त्याच्या बोलण्याने नव्हे - आमच्या !
पंधरा मिनिटे निघून जातात 
अन् प्रोफेसर आयार सुरुवात करतात 

कुठून तरी बोळा येतो-
आवडतीच्या डोक्यावर 
प्रत्युत्तर म्हणून मग सुरु होते बोळायुद्ध
आणि पाहत असतो अय्यर उभा राहून स्तब्ध 
राहिले दूर दटावणे
आलेला बोळा पायाने ढकलून 
सोडवत असतो उदाहरणे !

'वुई वॉंट अय्यर' सुरु होतो नारा 
हतबल होऊन सांगतो बिचारा 
डोंट शाऊट सो लाऊडली
आउट साईडर मे लिसन 

सांगाव वाटतं त्याला
आम्ही पाहतच असतो 
बाहेर कुणी दिसत का !!
आपकाही लेक्चर रेहता है
अंदर रेहके बहार देखनेका !No comments: