Pages

Monday, October 05, 2009

बरसलास तू असा...

मी विचारलं पावसाला
बरसशील का रे तू असा मनासारखा?...
बरस असा की  कोष सारे विरुन जावे
सभोवती वाहतील फक्त मायेचे झरे

बरसला बेभान होऊन तो एकदा...
ओलावल्या चिंब दाही दिशा
पण शेवटल्या सरीला.... 
उन्माद सरला.. आवेग ओसरला...
अखेरचा  थेंब पावसाचा
या डोळ्यांतून ओघळला...

-दिनेश गिरप.

3 comments:

क्रांति said...

va! surekh!

दिनेश said...

aabhari aahe..

निनाद गायकवाड said...

सर छान कविता आहे ! तुमचे मराठी पण खूप छान आहे !