Pages

Sunday, February 02, 2020

विचार आणि मी

एकटा गाठूनी भिडले मला टोळके विचारांचे
होते त्यात काही उधारीचे काही माझे पदरचे
काही शिळे कालचे काही येणाऱ्या उद्याचे
काही थकल्या मनाचे काही जनांच्या रितींचे
काही जमेच्या बाजूचे काही नुसत्याच तोट्याचे
काही होते विकतचे तर काही वृथा फुकटचे
काही मोहाच्या क्षणांचे काही सर्वस्व त्यागाचे
काही कुणी असण्याचे काही मी ही नसण्याचे

No comments: