Pages

Wednesday, December 18, 2019

ग्रीटिंग कार्ड

Dear Mom and Dad
I am greatful to you for your endless love. Thank you for making me laugh when I am sad. I am thankful to you for all the steps you are taking today. I love my Mom and Dad.
With Love .
आज एका सहा वर्षाच्या चिमुरडीने आपल्या आई बाबांना साठी बनविलेल्या ग्रिटींग कार्ड मध्ये लिहिलेलल्या या ओळी वाचून अगदी भरून आले!
माझा मुलगा जेव्हा लहान होता तेव्हाही तो जेव्हा कार्ड वर असे काही लिहायचा तेव्हाही असेच व्हायचे. प्रत्येक आई बाबांनी हा अनुभव नक्की घेतला असेल.    हळू हळू मुले मोठी होत जातात. त्यांचे विश्व व्यापक होते. लहानपणी आईबाबांपुरते मर्यादित असलेले जग नंतर शाळा, शिक्षक, मित्र मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी-पाजारी असे विस्तारित होत जाते आणि त्याच बरोबर काही व्याख्याही बदलत जातात. लहानपणी हसविणाऱ्या गोष्टी आता हसवत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टींतून मिळणारा आनंद कमी कमी होत जातो. आणि मग तेथून सुरू होते ती आयुष्यभराची 'आनंद' शोधायची कसरत. घरी आणलेली नवीन खेळणी एक दोन दिवसात जुनी होऊन जातात, त्यातली 'मजा' संपून जाते. जी गत छोट्या छोट्या खेळण्यांची तीच गत महागतील महाग गॅजेट्स ची किंवा अगदी छंदांची सुद्धा. हळू हळू नात्यांमध्ये सुद्धा ही गोष्ट झिरपतेच.
या सगळ्यात त्यांची चूक नाहीच. अशाच पद्धतीने जग त्यांच्या समोर येते. आपण पालकांनाही बऱ्याचद्या याची जाण नसते. खरा 'आनंद' बऱ्याचदा आपल्यालाच गवसलेला नसतो. मोठेही विसरलेले असतात त्यांच्यातल्या 'ब्रम्हा'ला. बऱ्याचदा 'संस्कार' करणे म्हणजे 'काय करावे आणि काय करू नये' याचे धडे द्यायचे असा समज असतो पण  'संस्कार' करणे हे शाळेत एखादा विषय शिकविल्यासारखे नसते. मुलांवर जे संस्कार पालकांना करायचे आहेत ते प्रथम आपण आचरणात आणून त्या प्रमाणे आपण वागलो तर हे 'संस्कार' आपोआप होतात.
मुलांना खरा आनंद शोधायला शिकवा. बेगडी जगाची ओळख करून द्या. छंद जोपासायला शिकवा व त्यातून मिळणाऱ्या अथक आनंदाची ओळख करून घ्या.  क्षणिक आनंद देणाऱ्या गोष्टींना मुले सर्वस्व मानायला लागतात. त्यासाठी प्रथम तुमच्या आयुष्यातून अशा गोष्टी बाजूला करा. नात्यांमधील ओलावा, गोडवा, खरेपणा त्या लहान जीवांपर्यंत पोहचू द्या. ज्यांच्या पर्यंत हा ओलावा पोहचला ती मुले मोठी झाल्यावर आयुष्यात कधीच कोमेजून जाणार नाहीत.
-- श्रीस्वासम
(लेख आवडल्यास जरूर शेअर करण्यास हरकत नाही)

No comments: