Pages

Saturday, October 26, 2019

बाबांचे हात

एक तरुण मोठ्या कंपनीत एका मोठ्या पदासाठी मुलाखत देण्यासाठी  गेला. त्याने प्रारंभिक मुलाखत उत्तीर्ण केली आणि अंतिम मुलाखतीसाठी तो कंपनीच्या डायरेक्टर ला भेटणार होता. डायरेक्टरने त्याचा रेझ्युमे पाहिला, तो उत्कृष्ट होता.
'तुला शाळेसाठी शिष्यवृत्ती मिळाली आहे का?'
मुलाने उत्तर दिले 'नाही'.
'तुझ्या वडिलांनीच तुझ्या शिक्षणासाठी पैसे दिले?
'हो' त्याने उत्तर दिले.
'तुझे वडील कुठे काम करतात?
'माझे वडील लोहार आहेत' तो म्हणाला.
डायरेक्टरने त्या मुलाला आपले हात दाखवायला सांगितले. त्या मुलाने समोर धरलेले हात एकदम मृदू आणि नीट नेटके होते .
'तू कधी वडिलांना त्यांच्या कामात मदत केली आहेस? '
'कधीच नाही, माझ्या वडिलांनी नेहमीच मला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांना आपला मुलगा शिकून मोठ्ठा साहेब बनावा असे नेहमीच वाटत आलेय त्यामुळे त्यांनी कधीच मला त्यांचे काम नाही करु दिले'
'तू आज घरी जाशील तेव्हा जाऊन तुझ्या वडिलांचे हात धुवून घे आणि मग उद्या मला भेटायला ये.' डायरेक्टर म्हणाले
घरी जाताना तो खूप खुश होता. आपल्याला ही नोकरी मिळणारच असे त्याला वाटत होते.
जेव्हा तो घरी परत आला तेव्हा त्याने आपल्या वडिलांना आपण त्यांचे हात धुऊन देतो असे सांगितले.
त्याच्या वडिलांना आश्चर्य वाटले. आनंदी परंतु मिश्रित भावनांनी आणि त्याने आपल्या मुलाला आपले हात दाखविले. त्या तरूणाने  हात धुतले. पहिल्यांदाच त्याने आपल्या वडिलांच्या हातांना पडलेल्या सुरकुत्या  पाहिल्या. हातांवर खूप चट्टे पडले होते. काही जखम पण होत्या. हात धुताना त्या खरखरीत हातांचा स्पर्श त्याच्या अंगावर शहारे आणत होता.
आपणांस व्यवस्थित शिकता यावे म्हणून या हातांनी काय काय कष्ट घेतले आहेत ते प्रथमच त्याला कळत होते. त्याच्या शिक्षणाची आणि उज्वल भविष्याची किंमत त्यांच्या वडिलांनी आपल्या हातावरच्या जखमांनी चुकविली होती.
वडिलांचे हात स्वच्छ केल्यावर त्या तरुणाने  अबोलपणे दुकानातील बाकीचा पसारा आवरला  त्या रात्री वडील व मुलगा बराच वेळ बोलले.
दुसर्‍या दिवशी सकाळी तो तरुण डायरेक्टरच्या कार्यालयात गेला तेव्हा डायरेक्टरला त्या मुलाच्या डोळ्यातले अश्रू दिसले जेव्हा त्याने त्याला विचारले,
'तू घरी काय केलेस आणि काल काय शिकलास ते सांगशील?'
'मी माझ्या वडिलांचे हात धुतले आणि  दुकानाची साफसफाई केली. आता मला कळते आहे की मी आज जो कुणी आहे तो पालकांच्या मेहनती शिवाय बनूच शकलो नसतो.  माझ्या वडिलांना मदत केल्यावर मला कळले की  स्वतःहून काहीतरी करणे किती कठीण असते. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबास मदत करण्याचे महत्त्व आणि त्यातला आनंद मला कळला'
डायटेक्टर म्हणाले, 'मी माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये हाच गुण शोधत असतो. मला असे लोक हवे असतात ज्यांना दुसऱ्यांनी केलेल्या मदतीची जाण असते. आपल्याला मदत करण्यासाठी दुसरा जो काही कष्ट करतो त्याची कदर असते आणि  पैसा हेच आयुष्यातील एकमेव लक्ष्य नाही हे जे जाणतात'.
'तुला ही जाणीव आहे त्यामुळे मी तुला नोकरीवर घेतलंय'. ते म्हणाले.
ज्या मुलांना खूप सुरक्षित वातावरणात वाढवले जाते , ज्यांना पाहिजे असलेल्या सर्व गोष्टी देण्यात येतात त्यांची  कधी कधी अशी मानसिकता विकसित होते की  हे सर्व माझ्या हक्काचेच आहे.  पालक, कुटुंब आणि मित्र यांच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करून स्वत: ला आणि फक्त  स्वत: लाच प्राधान्य देण्याची वृत्ती तयार होते. आपण या प्रकारचे संरक्षण देणारे पालक असल्यास आपण खरोखर प्रेम दाखवत आहोत की आपण आपल्या मुलांचे भविष्य डळमळीत  करण्यात मदत करीत आहोत याचा विचार व्हायला हवा.
आपण आपल्या मुलास त्यांची स्वतःची खोली देऊ शकता, चांगले अन्न, संगणक, टॅबलेट, सेल फोन आणि एक मोठा स्क्रीन टीव्ही, परंतु जेव्हा जेव्हा आपण लादी साफ करता  किंवा भिंत पेंट करता तेव्हा मुलांनाही ते अनुभवण्याची आवश्यकता असते.
जेवल्यानंतर त्यांना आपल्या भावा-बहिणींसह भांडी धुण्यासाठी प्रोत्साहन द्या.  त्यांना तुमच्याबरोबर कपडे धुण्यासाठी किंवा  स्वयंपाक करण्यासाठी, बाहेरची कुठलीतरी कामे करण्यासाठी आपल्यावबरोबर घ्या. आपण गरीब आहात किंवा आपल्याला पैसे देऊन ही कामे करवून घेणे परवडणारे नाही म्हणून आपण हे करत नसता तर आपण त्यांच्यावर प्रेम करता आणि त्यांना जीवनाबद्दल काही गोष्टी समजून देण्यासाठी हे करायचे असते.
योग्य प्रकारे काम करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात याची जाणीव मुलांना होणे  आवश्यकता आहे. त्यांना जीवनात यशस्वी होण्याकरिता येणाऱ्या अडचणींचा अनुभव घेण्याची गरज आहे. त्या साठी कधीकधी अपयश येते तेव्हा त्यावर मात काशी करायची ते पण शिकण्याची गरज आहे.
इतरांशी कसे सहकार्य करावे, अपयश आले तरी  ध्येय गाठण्यासाठी नेहमी अधिक परिश्रम करावे आणि  यशस्वी होण्यासाठी मनापासून केलेल्या प्रयत्नांचा सार्थ अभिमान कसा बाळगावा हे त्यांना शिकायचे असते.
दुसऱ्यांना काही देण्यातील आनंद, दुसऱ्यांची  सेवा करण्यातील आनंद त्यांना  आपल्या घरात शिकू द्यावा.
(भाषांतरित)
दिनेश गिरप

No comments: