Pages

Sunday, September 22, 2019

जेव्हा...

भारलेल्या डोळ्यांनी स्वप्न पाहावे
जेव्हा.....
भरलेल्या डोळ्यातून अश्रू ओघळावा

हातावरच्या रेषांनी भाकित करावे
जेव्हा.....
ओंजळीतला प्राजक्त निसटून जावा...

गंध लेऊन तुझा फुलांपरी सजावे
जेव्हा....
पाण्याविना पानांचा  रंग बदलावा 

चांदणे पांघरुनी पापण्या मिटाव्या
जेव्हा....
शुष्क स्वप्नांचाच दिलासा असावा...

अवचित असे कधी उजाडुन यावे
जेव्हा...
रात्रीस माझिया अंत ही नसावा...
दिनेश

No comments: