Pages

Sunday, September 29, 2019

फसलेला दांडिया आणि शिकलेला धडा !

आज नवरात्री दरम्यान खेळला जाणार दांडिया पाहिला की पंचवीस-सव्वीस वर्षापूर्वीची घटना आठवते. त्यावेळी दांडिया खेडोपाडी पसरलेला नव्हता. गावचा नवरात्र उत्सव हा देवळात घटस्थापना करण्यापुरता मर्यादित असायचा.  आम्ही मित्रमंडळी त्यावेळी बारावी तेरावी ला असू.  आमचा सात आठ मुलांचा  ग्रुप होता. कोणाच्या तरी मनात आलं की आपण ह्या वर्षी गावात दांडिया आयोजित करायचा. टीव्ही वर दाखवली जाणारी मुंबईतील मोठ मोठया दांडिया ची दृश्ये गावी सगळ्यांनाच आकर्षित करायची.  त्यामुळे आपल्या गावात अगदी मुंबई सारखा नाही पण छोट्याशा प्रमाणात दांडिया आयोजित करायची कल्पना सर्वानाच आवडली. आमच्या पैकी सारेच नुकतेच बारावी झालेले. कमावणारे कुणीच नाही त्यामुळे दांडियासाठी लागणारे पैसे हे आमच्या साठवलेल्या पैशातून द्यायला लागणार होते. कुणाच्याही घरून दांडियासाठी म्हणून पैसे मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती उलट नसत्या उचापती कशाला करताय असा फुकट सल्ला मिळाला असता!
कमीत कमी खर्चात एक दिवस का होईना पण आपण दांडिया आयोजित करायचाच असे सर्वांचे मत पडले. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जागेचा होता.  आमच्याच एका मित्राच्या वाशील्याने शाळेचे पटांगण आम्हाला वापरायला मिळाले. आमच्या  ओळखीच्यापैकी एकाचा म्युझिक सिस्टम भाड्याने देण्याचा व्यवसाय होता. त्याच्याशी जरा घासाघीस करून म्युझिक सिस्टम आणि लाइट्स भाड्याने घेतल्या. आता एवढ्या तयारीनिशी आम्ही दांडिया नाईट आयोजित करण्यासाठी तयार होतो! त्यावेळी आता सारखी पोलिसांची परवानगी, रात्री 10 पर्यंतची मर्यादा असा काही प्रकार नव्हता.
मोबाईल, व्हॉट्सॲप नसल्यामुळे आमच्या दांडिया ची प्रसिद्धी तोंडी जेवढी करता येईल तेवढी आम्ही केली! दोन दिवस जो भेटेल त्याला "रात्री दांडियाक ये हा नक्की" असे सांगत सुटलो होतो.
तो जमाना ऑडिओ कॅसेट चा होता. दांडियाला वाजवता येतील अशी गाणी असलेली कॅसेट्स गावातल्या दुकानांमध्ये शोधुन झाल्या. आज आपल्याला हवी ती गाणी आपल्याला मोबाईलच्या एका क्लिक वर उपलब्ध आहेत पण त्यावेळी गाण्यांसाठी 'ऑडिओ कॅसेट' हा एकच पर्याय उपलब्ध होता.
संध्याकाळी दोन तीन तास राबून आम्ही सारी तयारी करून ठेवली. एवढी सारी मेहनत केल्यावर आता धाकधूक होती ती दांडिया खेळायला कुणी येते की नाही. नाहीतर आम्हा मित्रांनाच  खेळायला लागला असता. रात्री आठ साडे आठ च्या दरम्यान हळू हळू  आमच्याच ओळखीचे शाळा कॉलेज मधील मुले मुली यायला लागले त्यामुळे आम्हा सगळ्यांना हायसे वाटले. काहीजण दांडिया खेळण्याच्या तयारीने आले होते तर काही जण नुसते पाहण्यासाठी. नऊ साडेनऊला आतासा कुठे दांडिया जोर धरू लागलेला असतानाच अचानक आरडाओरडा ऐकू आला आणि काही कळायच्या आत पाच सहा लोकांनी येऊन तोडफोड करायला सुरुवात केली. त्यांचा सर्व राग त्यांना विश्वासात न घेता गावात असा कार्यक्रम आयोजित केला कसा गेला यावर दिसत होता. कुणी त्यांना आवरायच्या आत आमच्या स्पीकर्स आणि लाईट्स चे नुकसान त्यांनी केले होते. त्यावेळचा आमचा दांडिया सुरू झाल्या झाल्या तेथेच संपला!

दुसऱ्या दिवशी झालेल्या नुकसानाचा अंदाज घेण्यासाठी आम्ही सकाळीच एकत्र आलो. झालेली गोष्ट घरापर्यंत नेण्यात काही अर्थ नव्हता पण आता साऊंड सिस्टीमवाल्याचे नुकसान कसे भरून द्यायचे हा मुख्य प्रश्न होता! आम्हाला आता फक्त एकच पर्याय दिसत होता आणि तो म्हणजे  सरळ आमदारांच्या घरी जाऊन त्यांच्या कानावर झालेला प्रकार सांगून आर्थिक मदत मागायची! आमदारांचे घर गावातच होते. नुकतेच मतदार झालेलो आम्ही तेथे जाऊन पोहचलो आणि त्यांच्या कानावर झालेला प्रकार घालून आता तुम्हीच 'तारणहार' असे साकडेही घातले! अर्थात त्यांच्यासाठी आम्ही मागत असलेली आर्थिक मदत ही नगण्य होती पण आमच्यासाठी ती रक्कम उभी करणे म्हणजे एक दिव्य होते. आमदारांनी पण अगदी वेळ देऊन आमचे सारे म्हणणे ऐकून घेतलेच पण झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आर्थिक मदत पण दिली!
त्यानंतर आता आमच्यापैकी जे कुणी गावी स्थायिक झाले त्यांनी नंतर अशा प्रकारचे अनेक उपक्रम राबविले पण राजकीय पाठबळ पाठीशी आहे ही खात्री बाळगून हे नक्की!

Wednesday, September 25, 2019

प्रोफेसर सतीश धवन... ज्यांनी भारतीय अंतराळ संशोधनाला आकार दिला

अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने केलेली नेत्रदीपक कामगिरी ही प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावी अशीच आहे. त्यामुळेच आज भारताच्या तरुण पिढीला  अंतराळ संशोधन क्षेत्रात करिअर प्रेरणा मिळत आहे.  अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर आज आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेला आहे.  या दैदित्यमान कामगिरीचा पाय ज्याने रचला अशा प्रोफेसर सतीश धवन यांचा आज जन्मदिवसजरी भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक  विक्रम साराभाईं असले तरी  इसरो ला जागतिक दर्जाची संस्था बनविण्यात प्रोफेसर धवन यांचा खूप मोलाचा वाट आहे


२५ सप्टेंबर, १९२० रोजी श्रीनगर येथे जन्मलेल्या सतीश धवन यांनी पंजाब विद्यापीठातून  गणितातील बीए, इंग्रजी साहित्यात एम. आणि मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये बी. या पदव्या प्राप्त केल्या. १९४७ साली नव्याने स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारताने पहिले पाऊल उचलले तेव्हा धवन आपले उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेले. त्यांनी मिनसोटा विद्यापीठातुन  एरोनॉटिकल अभियांत्रिकीमध्ये एम. एसकेले आणि त्यानंतर  मध्ये कॅलटेक मधून  एरोनॉटिक्स आणि गणित विषयात पीएचडी केलीयाच वेळी त्यांनी फ्ल्युईड डायनेमिक्सच्या क्षेत्रातील संशोधन कारकीर्दीची सुरूवात केली.


त्यानंतर लवकरच ते बेंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेमध्ये (आयआयएससी) वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी म्हणून रूजू झाले. काही वर्षांनंतर त्यांची पदोन्नती एरोनॉटिकल अभियांत्रिकी विभाग प्रमुखपदी झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली हा  विभाग हा भारताच्या फ्ल्युईड डायनेमिक्सच्या क्षेत्रातील संशोधनाचा केंद्रबिंदू झाला.


१९६२ मध्ये त्यांना आयआयएससीचे संचालक म्हणून नियुक्त केले गेले. या प्रतिष्ठित पदावर नियुक्त होणारे  ते  सर्वात तरुण संचालक होते. एवढेच नव्हे तर संस्थेच्या इतिहासात  सर्वात दीर्घकाळ संचालक पदावर काम करणारे अधिकारी ठरलेसुमारे नऊ वर्षे आयआयएससी संचालक म्हणून काम केल्यावर, १९७१ मध्ये धवन एक वर्षाची \रजा  घेऊन अमेरिकेतील कॅलटेक मध्ये  संशोधनासाठी गेले याच सुमारास  ३० डिसेंबर, १९७१ रोजी विक्रम साराभाई यांच्या आकस्मिक निधनानंतर पंतप्रधानांनी इंदिरा गांधी यांनी त्यांना  भारतात परत येऊन भारतीय अंतराळ  कार्यक्रमाचा पदभार स्वीकारण्याची विनंती केली


भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक, साराभाईंना संप्रेषण, हवामानशास्त्र आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये ज्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो त्याचे निराकरण करण्यासाठी अंतराळ विज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा होता. सतीश धवन यांच्याशी त्यांचा संबंध त्याच संदर्भात आला होता.  त्यांनी श्री धवन याना  पत्र लिहून  भारतात घन रॉकेट मोटर सुविधा सुरू करण्याबाबत तांत्रिक सल्ला विचारला होता.


साराभाईंच्या दुःखद मृत्यूनंतर धवन यांना देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे मुख्य कार्यभार स्वीकारण्यास सांगण्यात आले परंतु धवन यांनी दोन  अटींवर कार्यभार स्वीकारण्याची तयारी दाखविली - त्यांना अंतराळ कार्यक्रमाचे मुख्यालय बेंगळूरूमध्ये हवे  होते आणि आयआयएससीचे संचालक म्हणून काम सुरु ठेवण्याची परवानगी हवी होती.  त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या दोन्ही अटी  मान्य केल्या. आणि प्रोफेसर धवन पुन्हा भारतात परत आले.


त्यानंतरच्या दशकात धवन यांच्या मार्गदर्शनाखाली  भारतीय अवकाश कार्यक्रमाने भरीव प्रगती केली.   इस्रो येथे त्यांनी नाविन्यास प्रोत्साहन देणारी  गतिशील व्यवस्थापकीय  रचना निर्माण  केली आणि त्याचे फळ म्हणून आज आपण अवकाश संशोधनात अग्रेसर असणारे राष्ट्र बनलो आहोतया रचनेमध्ये  प्रकल्प संचालकांना  विविध केंद्रांतील तज्ञांच्या छोट्या चमूचे अध्यक्ष बनवले गेले. त्यामुळे इस्रो मधील प्रत्येक केंद्राच्या  स्वतंत्र प्रयत्नांचा उपयोग  जास्त सुनियोजित पद्धतीने उपग्रह वा प्रक्षेपण वाहन सारखे महत्वाकांक्षी प्रकल्प साकार करण्यासाठी  केला जाऊ शकला. या प्रकल्पांमध्ये संस्थेच्या बाहेरील तज्ञांना सामील करून पारदर्शकता आणि व्यावसायिकतेस प्रोत्साहित केले गेले.


प्रोजेक्ट संचालकांना निर्णय घेण्याची मुभा देऊन धवन यांनी हेही दर्शविले की लाल फिती मध्ये अडकता अत्याधुनिक प्रकल्पांची अंमलबजावणी वेळेच्या आधीन राहून करता येतेत्यांनी इस्रो प्रकल्पांमध्ये स्वदेशी बनावटीच्या  महत्त्वपूर्ण भूमिकेचा आग्रह धरला. त्यामुळेच आज सार्वजनिक आणि खाजगी अशा शेकडो औद्योगिक संस्था इस्रोसाठी अनेक प्रकारच्या अवकाश-गुणवत्तेचे हार्डवेअर तयार करतात.


युवा कर्मचाऱ्यांना  प्रोत्साहन देणे, यश मिळाल्यास त्यांना श्रेय देणे आणि अपयशी ठरल्यास जबाबदारी स्वीकारणे याच्यावर त्यांनी नेहमी भर दिला. . या संदर्भात, भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी एसएलव्ही-3 भारताच्या पहिल्या प्रक्षेपण वाहनाच्या प्रक्षेपण प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून आपले अनुभव सांगितले आहेत


एसएलव्ही -3 ची पहिली प्रायोगिक लाँचिंग १० ऑगस्ट १०७९ रोजी झाली, परंतु ती अपयशी ठरली. त्यानंतर आलेल्या पत्रकार परिषदेत धवन यांनी कलाम यांना सांगितले की ते परिस्थिती हाताळतील आणि अपयशाची जबाबदारी स्वतः स्वीकारलीपुढच्या वेळी एसएलव्ही-3 लाँच केले गेले (१८ जुलै १९८० रोजी) ते  एक अभूतपूर्व  यश होते. एसएलव्ही -3 ने १९८०  मध्ये ४० किलो वजनाचा  रोहिणी उपग्रह कक्षेमध्ये स्थिर केला  ज्यामुळे भारत खऱ्या अर्थाने अंतराळ युगात आला. या यशाच्या वेळीमात्र  धवन यांनी कलाम यांना आपल्या टीम सदस्यांसह पत्रकार परिषद घेण्यास सांगितले.


धवन यांनी निर्माण केलेली  व्यवस्थापन संरचनेच्या एवढी यशस्वी झाली की  भारतातील इतर संशोधन विकास केंद्रांद्वारे, विशेषतः संरक्षण संशोधन विकास संस्था (डीआरडीओ) च्या उच्च-तंत्रज्ञान प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी अशीच व्यवस्थापन संरचना स्वीकारली गेली .


धवन यांच्या नेतृत्वाखाली , इस्रोने विक्रम साराभाईंचे अवकाश विज्ञान वापरुन भारताच्या विकासाची पूर्तता करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने कार्य केलेग्रामीण शिक्षण, रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन्समध्ये विविध यशस्वी प्रकल्प इस्रोने राबविले

सेवानिवृत्तीनंतरही विज्ञान आणि तंत्रज्ञान, विशेषत: अवकाश तंत्रज्ञानाच्या सार्वजनिक धोरणाच्या बाबींकडे त्यांनी आपले पुरविले.  जानेवारी, २००२ रोजी त्यांच्या निधनानंतर, भारताने केवळ एका प्रतिष्ठित शास्त्रज्ञाला गमावले नाही, तर अशा एका असामान्य व्यक्तीला गमावले जिने ज्या ज्या संस्थेत काम केले त्या त्या प्रत्येक संस्थेत असा आमूलाग्र  बदल घडवून आणला की ज्यामुळे त्या संस्थेने अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी साध्य करून दाखविल्या.
   


-- दिनेश गिरप
x