Pages

Friday, May 31, 2019

कैफ


रिचवले आहेत आम्ही ही प्याले कैक तुझ्या कैफाचे...
आज ढळला तोल पण सारे वारेच होते वादळाचे ..

देणे

नसेन प्राक्तनात मी तुझ्या जरीही
देणे माझे पण बाकी होते गतजन्मीचे
© दिनेशG

माझा न  राहिलो मी- गजल


माझेच आयुष्य ज्याला मी कधी कळलोच नाही
शोधतो माझा मला मी या जगीचे भान नाही
दूर तेवणाऱ्या दिव्याची साद मोठी आर्त आहे
जाणिवांचा गंध नाही रात्र मोठी किर्र आहे
माझा न  राहिलो मी सुटले सारे किनारे
मागू तुझ्याकडे आता कुठल्या जन्मीचे पुरावे

Monday, May 27, 2019

घंटानाद

गावी घराशेजारीच कुलदेवतेचे मंदिर आहे. गावी असल्यावर सकाळी आंघोळ आटोपल्यावर मंदिरात जाणे हा शिरस्ता. पण आज अचानक संध्याकाळी वाटले की देवळात जावे. देवळात गेलो तेव्हा आत बसलेल्या एक दोन माणसांशिवाय कुणीच नव्हते. देवळाच्या प्रवेशद्वारापाशी दोन घंटा टांगलेल्या आहेत. प्रवेश करतानाच मी ठरवले होते की फक्त एकदाच हलकीशी घंटा वाजवायची. त्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने एकदा घंटानाद करून मी गाभाऱ्यात गेलो. प्रवेशद्वार ते गाभारा अंदाजे पन्नास साठ फुटाचे अंतर आहे.  देवीसमोर हात जोडताना लक्षात आले की सतत घंटानाद होतोय. मागे वळून पाहिले तर  कुणीच नव्हते पण प्रवेशद्वारापाशी असलेल्या त्या दोन घंटा एकमेकाला आपटून सतत घंटानाद होत होता. मी घंटा वाजवताना अजिबात हेलकावे दिले नव्हते हे मला स्पष्ट आठवत होते. उलट मी खूप हळुवार पणे घंटा वाजविली होती. तरीपण त्या आजूबाजूला टांगलेल्या दोन्ही घंटा आडव्या हेलकावे खात एकमेकाला आपटत सतत घंटानाद होत होता. मी नमस्कार करून प्रदक्षिणा पूर्ण केली व गाभाऱ्यातून सभामंडपात येऊन बसे पर्यंत घंटानाद चालू होता. म्हणजे  जवळजवळ चार मिनिटे तरी नक्कीच! तो संपूर्ण वेळ मी डोळ्यातील पाणी थोपवत देवीच्या आशिर्वादाची अनुभूती घेत होतो.

Sunday, May 26, 2019

प्राजक्ताचा सडा

जमिनीवरचा तो  प्राजक्ताच्या फुलांच्या सडा मला नेहमी प्रश्न विचारतो- बघ उमजते का तुला माझ्या एका रात्रीच्या आयुष्यातले गंधीत मर्म!
©दिनेश

सुबह

अंधेरे से की है जो दोस्ती कुछ इस तरह हमने
जिसका इंतजार था वह सुबह  कभी हुयी ही नही
©दिनेश  

Monday, May 20, 2019

मनापासून मनापर्यंत

माणूस पार चंद्रापर्यंत भलेही पोहोचला असेल पण अजूनही बहुतांशी लोकांना पार करायला कठीण जाते ते मनापासून ते मनापर्यंतचे अंतर !
- दिनेश G

Monday, May 13, 2019

धागा सुखाचा

गुंतलेल्या धाग्यांमधला धागा सुखाचा शोधतो
सुन्या सुरांच्या हिंदोळ्यावर झुला कधीचा झुलतो
©दिनेश

Sunday, May 12, 2019

हॅप्पी मदर्स डे!

रविवारची सकाळ तशी थोडीशी आळशीच असते.  त्यामुळे लवकर उठायचा प्रश्नच नव्हता.  सकाळी सकाळी दाराची बेल वाजली!
‘रविवारी… एवढ्या सकाळी कोण आलंय?’ मनाशी पुटपुटत त्याने दार उघडले.
तू? ...आज?... अशी?.. अचानक? त्याने गोंधळलेल्या अवस्थेत प्रश्न केले
‘अरे हो हो...मला आत तर येऊ देशील की नाही?’ तिने त्याच्याकडे मिश्किल नजरेने पहात  विचारले.
‘हॉल मध्ये किती पसारा करून ठेवलायास हा?’ आत आल्या आल्या तिने विचारले
‘झ.. झालाय खरा…’ तो चाचरत म्हणाला .. किचन मधल्या पसऱ्यासाठी आता काय काय बोलले जाणार त्याची तयारी त्याने त्याचवेळी केली!
‘तू आज इथे कशी?’
‘ अरे असा काय करतोस? आज मदर्स डे आहे ना?’
खट्याळ हसत तिने विचारले.
“ओह.. हो आहे ना .. “  त्याला आठवले, मदर्स डे च्या निमित्ताने कालच तिने त्याला आईला फोन करण्याविषयी  बजावून सांगितले होते.
‘अरे आज मदर्स डे,  तू आईला फोन करणार ..तुला तिच्या हातच्या पुरणपोळीची आठवण येणार.. मग मी विचार केला आईच्या या लहान बाळाचे लाड मलाच पुरवावे लागणार ना?’
तिच्या या वाक्याने तो किती सुखावला! आयुष्यभराचा ठेवा त्याला तेथेच सापडला..
‘हॅलो… पुरणपोळ्यांसाठी लागणारे सामान आहे का किचन मध्ये?’ तिच्या प्रश्नाने तो भानावर आला!
‘नाही.. मी हा गेलो आणि घेऊन आलो!’ तो एवढ्या उत्साहात म्हणाला की जणू त्याचा पुन्हा जन्म झाला!
हॅपी मदर्स डे!!!
©दिनेश गिरप  

Saturday, May 11, 2019

खामोशीयांइस तनहाई का आलम मत पुछना मेरे दोस्त
अब खामोशीयां भी करती है अक्सर गुफ़्टगु हमसे
© दिनेश

Friday, May 10, 2019

छोट्याशा कथा (अलक)

वारांनी केलेल्या छेदांमधून पार होणाऱ्या प्रकाशा विरून जाता जाता हृदयातील काळोखे कोनाडे  हसून इतकेच म्हणाले.. 'आता तरी पहा नीट दिसते का?'
© दिनेश
***************************************
जेव्हापासून जनाच्या मनाप्रमाणे वागणे सोडले तेव्हापासून   अनोळखीही आपुलकीने विचारू लागले ..' किती बदललास रे?'
© दिनेश
***************************************
नेहमी तोच  संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावायचा. आज तिने लावला तर सारे घरदार त्या प्रकाशाने न्हाऊन निघाले... !
©दिनेश
*************************************
समजून न घेतल्या बद्दल तो 'सॉरी' म्हणाला , ती 'सॉरी' म्हणाली आणि ती दोघे आपापल्या घरी सुखाने नांदू लागली?
©दिनेश
**************************************
एकदा सुसंस्कृत शब्दांमध्ये चढाओढ लागली. त्यात 'सॉरी' चा पहिला नंबर आला !
©दिनेशG
**************************************

Tuesday, May 07, 2019