Pages

Friday, March 22, 2019

गाणे..

पूर्वी सारखे अचानक कानावर गाणे पडण्याचे प्रसंग आजकाल कमीच येतात. पूर्वी कुठेतरी ट्रांजिस्टर वाजत असायचा तर कुठे तरी टेप रेकॉर्डर. चालता चालता गाण्याचे स्वर अचानक कानावर पडायचे....
रसिक बलमा हाय
दिल क्यू लगाया तोसे
आतासे कधी कधी आपण टॅक्सी मध्ये किंवा कारमध्ये  एकटेच असतो. बाहेर  सोबतीला पाऊस असतो. छान अंधारून आलेले असते. आणि मनातले भाव ओळखून की काय FM वर मनाला छेडणारे स्वर कानावर पडतात..
फिर ले आया दिल
मजबूर क्या कीजे
रास न आया
रेहना दूर क्या कीजे
एखादा मोबाईल नंबर आपण पहिल्यांदाच डायल करत असतो आणि पलीकडून ती भूतकाळात घेऊन जाणारी कॉलरट्यून कानावर पडते...
तुने हो रंगीले कैसे जादू किया
पिया पिया बोले मतवाला जिया
व्हाट्सअप वर कधीतरी गाण्याचा असा एखादा मेसेज येतो की आपण न जाणे कितीदा तरी ते गाणे पुन्हा पुन्हा ऐकतो...
अधिर मन झाले मधुर घन आले
धुक्यातुनी नभातले, सख्या प्रिया
सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले..
या अवचित गवसलेल्या गाण्याची मजा काही वेगळीच असते. कधी आपल्या माणसाला गाण्यात  शोधायचे तर कधी आपल्या माणसात दडलेले गाणे शोधायचे
- दिनेश G

Sunday, March 10, 2019

भागाकार

भागाकार केल्यावर बाकी शून्य राहिली की उत्तर पूर्णांकात आल्याचे तेवढे समाधान!

Saturday, March 09, 2019

अवलंबित्व

जहाजाने शिडाला म्हणावे माझ्यावर अवलंबून राहू नकोस
पानानी झाडाला म्हणावे आमच्यावर अवलंबून राहू नकोस
पृथ्वीने पावसाला म्हणावे माझ्यावर अवलंबून राहू नकोस
फक्त “स्व” पासून जेव्हा “माणूस” दुसऱ्या जीवाची उत्पत्ति करायच्या उत्क्रांतीचा पल्ला गाठेल तेव्हा त्याने  खुशाल म्हणावे मी “स्वयंभू” …. अन झुगारून द्यावे ते टोचणारे “अवलंबित्व”....


Image by Kranich17 from Pixabay