Pages

Wednesday, April 26, 2017

एक रुपए से ईन्सान कि किमत बढती है या कम होती है?

एक रुपए से ईन्सान कि किमत बढती है या कम होती है?
रविवार  च्या सकाळी असे फार कमी वेळा होते की मी पेट्रोलपंप वर गेलोय. काही दिवसांपूर्वी तसा जाण्याचा योग आला. नेहमी त्याच पेट्रोल पंप वर जात असल्याने तेथील चेहरे ओळखीचे झालेत. त्यातलाच हा एक अठरा एकोणीस वर्षाचा मुलगा. गाडी आली की मोठ्या उत्साहाने हातवारे करून गाडी लावायला मदत करणार. गाडी बंदही करे पर्यंत याला धीर नसणार. मागे एकदा असेच गाडी लावल्या लावल्या पेट्रोल च्या टाकी चे झाकण लवकर उघडावे म्हणून त्याने दोन तीनदा गाडीवर थापा मारल्या होत्या तेव्हा त्याला ओरडलो होतो. पण आज मी त्याला पाहिल्या बरोबर ओळखीचे हसलो.
"साब, सुबह सुबह ऐसे कोई मुस्कुराता है तो अच्छा लगता है! सब ने ऐसेही हंसते रहना चाहिये"तो मला म्हणाला.
"हां भाई, मुस्कुराते रहोगे तो ही जिंदगी का असली मजा लोगे" मी पण एक डायलॉग ठोकून दिला!
काल परवा सकाळ च्या वेळी विद्यापीठात जात असताना  जेव्हा पुन्हा पेट्रोल पंपावर गेलो असताना त्याचा चेहरा उतरलेला दिसला. पेट्रोल भरून झाल्यावर न राहवून त्याला विचारले, " क्यों भाई, उस दिन तो बडे बोल रहे थे की सदा मुस्कुराते रहना चाहिये| आज क्या हुआ?
"साब, आप ही बताईये- एक रुपये से ईन्सान कि किमत बढती है या कम होती है?" त्याचा प्रश्न ऐकून सारा मामला माझ्या लगेच लक्षात आला.
सुट्टे नसल्याच्या नावाखाली पेट्रोलपंप वर काम करण्याऱ्यांचा एखाद रुपया कमी देण्याकडे नेहमी कल असतो. याने पण तसेच काहीसे केले असणार आणि समोरच्याने चांगले झापले असणार!
आता मी उत्तर काय देतो यावर माझी (यापुढे प्रत्येक वेळी पेट्रोल भरायला आलो की ) "ईज्जत कि कीमत" ठरणार असा धोका मला स्पष्ट दिसत होता!
"उसकी कीमत उसे ही तय करने दे| तुम क्यों दुःखी हो रहे हो?" मी समजावण्याचा सुरात म्हणालो.
"नहीं, फिर भी आप बताईये... एक रुपये से...." तो आपला मुद्दा सोडायला तयार नव्हता... मला आता हा "एक चुटकी सिंदूर" च्या धर्तीवर "एक रुपयेकी कीमत तुम क्या जानो दिनेश बाबू" असा डायलॉग ऐकवेल की काय अशी शंका आली!!
"जाने दो भाई.. तुम मुस्कुराते रहना" म्हणत मी गाडी सुरु केली!

No comments: