Pages

Wednesday, October 06, 2010

व्हॉट अ‍ॅन आयडिया सरजी!

२४ सप्टेंबर २०१०. बाबरी प्रकरणाचा निकाल येणार होता. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी एक आगळी शक्कल लढवली! त्यांनी सर्वाना फसवण्यासाठी तारीखच बदलून टाकली.
त्या दिवशी म्हणजे २४ तारखेला मी मुंबई ते कालिकत फ्लाईट २०३-A  च्या   केबिन बॅगेज साठीचा " Security check " स्टॅम्प घेतला तेव्हा त्यावरील तारीख बघून थक्क झालो ! २४ च्याठिकाणी चक्क ३४! खोलात जाऊन विचार केला तेव्हा कुठे वर सांगितलेला संदर्भ लक्षात आला!

Monday, May 17, 2010

आगथन - आगंतुक?

काही  दिवसांपूर्वी  केरळला असताना  नवीन मल्याळम मुव्ही   “ आगथन  ”  पाहण्याचा  योग  आला . आगथन चा जवळपास पोहोचणारा  मराठी अर्थ आपण "आगंतुक" असा घेऊ शकतो. त्याची कहाणी  कुठल्याही  भारतीय  चित्रपटात  शोभून  दिसेल  अशी  आहे. हिरो  लहान  असताना  त्याच्या  आई - वडिलांना  काश्मीरी  अतिरेकी  मारतात  आणि  बहिणीवर  भारतीय  सैन्यातील  एक  अधिकारी  बलात्कार  करतो .   नंतर  हिरो  मोठा   झाल्यावर   मोठ्या  हुद्द्यावरून  निवृत्त  झालेल्या  त्या  भारतीय  सैन्यातील  अधिकारयाचे  पितळ  कसे  उघडे  पडतो    याची  ही कहाणी  आहे . 

चित्रपटाच्या  सुरुवातीलाच  त्याच्या  आई  वडिलांना  अतिरेकी  मारतात  असा  सीन आहे .  रात्रीच्या  वेळी  सर्व  झोपलेले  असताना  अचानक  अतिरेकी  हमला  करतातहिरोच्या   घरात घुसून  AK-47 त्याचा  वडिलांवर  रोखून  म्हणतात   “ काश्मीर  सिर्फ  मुसलमानोंका है तुम  जैसे  हिंदुओंकी यहाँ  कोई  जगह  नही  “ अचानक  हिंदीमधून  आलेल्या  त्या  संवादाने   माझे  पूर्ण  लक्ष  खेचले . नंतरचा  काही  वेळ  मी  त्या  वाक्याबद्दल  विचार  करत  होतो . उद्या  काश्मिरेतर    प्रदेशातील   मुस्लीम  तेथे  गेले  तर  हे  अतिरेकी  त्यांचे  स्वागत  करतील कदापि  शक्य  नाही !  फाळणीच्या  वेळी  पाकिस्तानात  गेलेल्या  मुस्लिमांमध्ये  आणि  तेथील  मुळच्या मुस्लिमांमध्ये  आज  पण  भेदभाव  केला  जातो .  

 
-->लहान  पानापासून  इतिहास -भूगोलात  आम्ही  हेच  शिकलो  की   काश्मीर  हे  भारताचे   अविभाज्य  अंग  आहे .  नंतर  मोठे  होता  होता  सद्य  परिस्थिती  कळत  गेली . दुसरया देशांनी नकाशात भारताचा कश्मीर काढून घ्यावा आणि भारताने फ़क्त निषेध नोंदवावा  हा   विरोधाभास   आपण  सर्वांनाच  जाणवला   असेल .  पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला हेतुपरस्पर  हिंदू -मुसलमान असा रंग दिला गेला आहे. आपण सर्वांनी ही  गोष्ट लक्षात घेणे खूप गरजेचे आहे.  एक  हिंदू  म्हणून  नव्हे  तर  एक  भारतीय  म्हणून  मला  असे  वाटले  की   तो  डायलॉग   “काश्मीर  सिर्फ  हमारा  है  , यहाँ  तुम  जैसे  लोगोंकी कोई  जगह  नही ” असा  खपून  गेला  असता . यामुळे “हिंदू  आणि  मुसलमान ” असा  उल्लेख  सहज  टाळता  आला  असता . 

काश्मीर  मध्ये  जे  काही  होत  आहे  त्याला  हिंदू -मुस्लीम  रंग  देवून  जर  प्रत्येक  भारतीय  प्रांतात    काश्मिर-सदृश्य  स्थिती  तयार  करता  आली  तर  पाकिस्तानला  असुरी  आनंद  होईल ! मी  हा  सिनेमा   केरळ  मधील  एका  बहुसंख्य  मुस्लीम  लोकवस्ती असलेल्या   शहरामध्ये पाहत होतो.  माझ्या  आजूबाजूला  खुपसे  मुस्लीम प्रेक्षक  पण  सिनेमा  पाहत  असणार   हे  नक्की . मी  विचार  करत  होतो  की या  वाक्यावर  त्यांच्या  मनात काय  प्रतिक्रिया  उमटली  असेल ?


माझ्या २००७-२००८ या एका वर्षाच्या केरळमधील कन्नूर - कालिकत या मुस्लीम बहुसंख्य असलेल्या जिल्ह्यातील वास्तव्यात मला बऱ्याच गोष्टी अनुभवता आल्या. सर्वप्रथम मला जाणवले ते तेथे मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मियांचे असलेले बहुसंख्य प्रमाण आणि तरीदेखील एकजीव झालेला समाज. तेथील बहुसंख्य मुस्लीम हे साधन आणि शिक्षित आहेत. त्याच दरम्यान आलेल्या काही बातम्या मला व्यथित करून गेल्या. त्या बातम्या होत्या केरळ मधील काही मुस्लीम तरुणांचा अतिरेकी कारवायांमधील सहभागासंदर्भात. मुस्लीम बहुसंख्य असलेल्या या भागावर जेहादी संगठनांचे लक्ष असणे साहजिकच आहे. पण त्यांच्या जाळ्यात हे केरळ मधील तरुण कसे सापडले? त्याला कोण जबाबदार आहे? भारतात इतरत्र आढळणारी गरिबी येथे नाही. पण नोकरी धंद्यासाठी आखाती देशात जाणाऱ्यांचे प्रमाण येथे लक्षणीय आहे. याचाच फायदा या जेहादी संगठनानी घेतला असेल का? हा प्रदेश अशा कारवायांसाठी वापरला जाऊ शकतो अशी शंका अथवा शक्यता सरकारला वाटली नसेल का? 

अत्यंत सुंदर असा काश्मीर अतिरेकी कारवायांना कधीच बळी पडलाय. तेथील तरुण पाकपुरस्कृत खोट्या जिहादच्या जाळ्यात अडकला. आता त्यांचे लक्ष भारताचा दुसरा सुंदर प्रदेश ज्याला "देवाची भूमी" म्हटले जाते असा केरळ नाही ना? या आगंतुकांना थारा मिळणार नाही अशी आपली भूमी हवी. त्यांच्या जेहादी हाकेला आपल्या तरुणांनी उत्तर दिले पाहिजे ते  जाज्वल्य देशभक्तीने. आणि ही जाज्वल्य देशभक्ती सर्वत्र निर्माण करण्यासाठी  प्रत्येकाने  जागरूक राहून आपल्या आपल्यापरीने  प्रयत्न केले पाहिजेत. "ही भूमी फक्त आमची आहे, येथे आगंतुकांचे काही काम नाही"!