Pages

Sunday, December 03, 2006

साथ..अशी-हीएकलाच दीप
कसा शांत तेवतो...
ज्योतीच्या साथीने
अगदी अंतापर्यंत लढतो...

सभोवतालच्या सावल्या
दिव्याभोवती फेर धरतात...
ज्योत थरथरल्यावर
पोट धरुन केवढ्यांदा हसतात?

व्यथा त्या दिव्याच्या
फक्त ज्योतीलाच उमगतात...
पण उजेडातही कधी कधी
अंधाराचे हुंकार उमटतात....

अंतरंगातले मर्म त्याच्या
ज्योतीनेच जाणावे ....
शेवट समोर असला तरी
अंधाराला विसरावे.....

झुंझ असते वादळाशी
रोरावत्या वार्‍याशी .....
एकच जाणीव मनात असते
अभंग अखंड बंधाची......

एक दुसर्‍याच्या साथीने
अधःकारातून तरतात....
पण कधी कधी..
अस्तित्व टिकविताना
मागे फक्त खूणा उरतात....!
.... दिनेश गिरप